माळीनगर (युगारंभ )-सन १९७६ पासून कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य इत्यादीसह अनेक क्षेत्रात विविध उपक्रम व क्रीडा स्पर्धा राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर- अकलूज ची सन २०२३-२४ ची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उदय सभागृहात खेळीमेळीत संपन्न झाली.
सुरुवातीस सभेचे प्रास्ताविक मंडळाचे नूतन उपाध्यक्ष श्री. पोपट भोसले पाटील यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रेरणेने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील यांनी ११ सभासदांना सोबत घेऊन स्थापना केलेल्या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत १९७६ पासून अनेक राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, सामाजिक उपक्रम, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
यानंतर सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील (काकासाहेब) व स्व.श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील (आक्कासाहेब) यांच्या प्रतिमांचे पूजन जेष्ठ संचालक श्री.वसंत जाधव व सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सभेच्या इतिवृत्ताचे वाचन मंडळाचे नूतन सचिव श्री.बिभीषण जाधव यांनी केले.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या सभेत सात विषयांचे वाचन केले. त्यास सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.
अध्यक्षीय मनोगतामध्ये मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी मंडळाच्या वतीने चालू वर्षात स्व. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांची जन्मशताब्दी, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील आणि अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय त्रिमूर्ती कुस्ती स्पर्धा, राज्यस्तरीय लावणी स्पर्धा आणि राष्ट्रीय, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपसणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन केले असल्याचे सांगितले. मंडळाच्या यशात सर्व सदस्यांबरोबरच पडद्यामागच्या कलाकारांचे योगदान आहे.
मंडळाच्या हनुमान तालीम कुस्ती केंद्राच्या नूतनीकरणामुळे ग्रामीण भागातील अनेक गरजू व होतकरू मल्लांना विनामूल्य कुस्ती शिकण्याची संधी मिळाली व मंडळाच्या इमारतींचे नूतनीकरण केले
तसेच संस्थापक अध्यक्ष मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शाची प्रेरणा घेऊनच मनापासून कार्य करावे व मंडळाचे कार्य हे केवळ उपक्रम राबविणारी संस्था न राहता समाजाला प्रेरणा देणारी संस्था म्हणून भविष्यात काम करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 
सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये
-
जेष्ठ मार्गदर्शक संचालक म्हणून मा. श्री. जयसिंह मोहिते-पाटील,
-
मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील,
-
उपाध्यक्ष श्री. पोपट भोसले पाटील,
-
संचालक श्री. वसंत जाधव,
-
श्री. प्रताप पाटील,
-
श्री. यशवंत माने देशमुख,
-
श्री विश्वनाथ आवड,
-
श्री बाळासाहेब सावंत,
-
श्री भीमाशंकर पाटील,
-
खजिनदार श्री सुहास थोरात,
-
सचिव श्री बिभीषण जाधव,
-
निमंत्रित संचालक श्री नंदकुमार गायकवाड,
-
श्री रामचंद्र मिसाळ,
-
श्री राहुल गायकवाड,
-
श्री संजय झंजे,
-
श्री विशाल लिके,
-
सुपरवायझर श्री फिरोज तांबोळी,
-
सेवक श्री सोपान चव्हाण यांचा समावेश आहे.
या सभेस महादेव अंधारे, धैर्यशील रणवरे, उत्कर्ष शेटे यांचेसह विविध शाखांचे प्रमुख, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन राजकुमार पाटील, किरण सूर्यवंशी यांनी केले. मंडळाचे संचालक श्री. प्रताप पाटील यांनी आभार मानले. सभेची सांगता ‘सारे जहाँ से अच्छा’ या देशभक्तीपर गीताने झाली.