December 7, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हाराजकीय

भविष्यात सर्व सोयीयुक्त वृद्धाश्रम उभारणार ; जुल्कर शेख 

युवा सामाजिक कार्यकर्ते जुल्कर शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 अकलूज (युगारंभ )-येथील लोकनेते प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते जुल्कर शेख यांचा वाढदिवस दि २४ ऑक्टोबर रोजी अकलूज परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे रूग्णांना फळे वाटप तसेच बज्मे अन्वारे सुफिया मदरसा,अकलूज येथे फळे व धान्य वाटप करण्यात आले याचबरोबर गोविंद वृद्धाश्रम टेंभुर्णी येथे मिष्टान्न भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येत्या काळात सामाजिक कार्याच्या जोरावर समाजातील दुर्लक्षित निराधार वृद्धांसाठी सर्व सोयीयुक्त वृद्धाश्रम उभा करण्याचा मानस यावेळी जुल्कर शेख यांनी व्यक्त केला .

वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील , आण्णासाहेब शिंदे , आण्णासाहेब इनामदार , सतीश पालकर , फिरोज देशमुख , जावेद बागवान , विकास धाईंजे , अजय सकट , दादा नामदास, महेश शिंदे , जावेद बागवान , बाळासाहेब पराडे पाटील ,ॲड.वजीर शेख, गौरव एकतपुरे , मिलींद सरतापे , किरण धाईंजे , प्रा.नरेंद्र भोसले, नवनाथ साठे, मयुर माने , अब्बास शेख , शैला गोसावी , किरण महाराज जाधव, दिपक पिंजारे , अक्षय शेळके , मोहसीन बागवान यांसह परिसरातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Related posts

माळीनगर येथे डिसीसी बँकेचा 104 वा व माळीनगर शाखेचा 35 वा वर्धापनदिन साजरा

yugarambh

श्री.जयसिंह मोहिते- पाटील प्राथमिक शाळा संग्रामनगर प्रशालेमध्ये ‘प्रवेशोत्सव´.

yugarambh

महर्षि संकुल,यशवंतनगर’ येथे सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांची पुण्यतिथी साजरी

yugarambh

‘सौंदर्य’ या निसर्गाने दिलेल्या देणगीचे जतन करण्यासाठी,सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे – स्वरूपाराणी मोहिते-पाटील 

yugarambh

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विविध मागण्यांसाठी निवेदन

yugarambh

माळशिरस तालुक्यातील विज कामासाठी निधी द्या : आ. रणजितसिंह मोहिते पाटील 

yugarambh

Leave a Comment