लवंग (युगारंभ )-लवंग ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2023 च्या सहकार महर्षि पुरस्कृत जय बजरंग ग्राम विकास पॅनल, लवंगचा प्रचार शुभारंभ बजरंग मंदिर लवंग येथे धूमधडाक्यात झाला.
सकाळी नऊ वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांची रीघ मंदिराकडे सुरू झाली होती. एकूण पाच वार्डामध्ये होणारी ही निवडणूक त्यासाठी रिंगणात उभे असणारे 13 उमेदवार व सरपंच पदासाठी 1 उमेदवार अशा 14 जागांसाठी होणार असून अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची समजली जाते.दि.25 रोजी सर्व उमेदवारांना चिन्हे वाटप झाल्याने निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी जय बजरंग पॅनलने सर्वप्रथम बाजी मारली.
सरपंच पदासाठी उमेदवार प्रशांत पाटील यांना मिळालेले ट्रॅक्टर हे चिन्ह आहे. त्यानिमित्ताने मंदिरासमोर थेट ट्रॅक्टर उभा करण्यात आला होता. तसेच प्रभागातील इतर उमेदवारांना शिलाई मशीन व शिट्टी असे चिन्ह मिळाले आहे.प्रथम उपस्थित सर्व उमेदवार व पॅनल प्रमुखांनी बजरंगबलीचे दर्शन घेतले व रामदादा चव्हाण यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी उत्तम भिलारे, उत्तम मोलाणे, विजयकुमार पाटील, चंद्रसेन दुरापे, निशांत पाटील,धनाजी चव्हाण,ज्ञानेश्वर वाघ, बाळासाहेब वाघ,पप्पू चव्हाण,धनाजी मोहरे, निवृत्ती कदम, बाळासाहेब चव्हाण, रामचंद्र चव्हाण, मारुती चव्हाण, श्रीमंत गायकवाड सर,युवराज वाघ, जगन्नाथ कोकाटे, धनाजी थोरात, धनाजी भोळे, रावसाहेब पाटील, राजू पाटील, दादासो मोलाणे, गणपत मोलाणे, शंकर वाघ, ज्ञानेश्वर चौगुले, नेताजी वाघ,रणजीत चव्हाण, सतीश भिलारे, लालासो पवळ,भोसले अध्यक्ष, भजनदास चव्हाण, नितीन वाघ, गौतम पवळ यांच्यासह लवंग गावातील सर्व कार्यकर्ते व मान्यवर मंडळी उपस्थित होते.
हलगीच्या साथीने व टाळ्याच्या कडकडाटाने सर्व उमेदवारांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी सर्व उमेदवारांचे कोकाटे पाटील परिवाराच्या वतीने औक्षण करण्यात आले व विजयी भव: असा आशीर्वाद दिला.