December 2, 2023
yugarambh
Breaking News
आंतरराष्ट्रीयखेळराष्ट्रीय

शिवतिर्थ आखाडा, शंकरनगर- अकलूज येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती व त्रिमुर्ती केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

लवंग (युगारंभ )-श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते- पाटील उर्फ आक्कासाहेब यांची जन्मशताब्दी तसेच जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मदनसिंह शंकरराव मोहिते- पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या वाटचालीनिमित्त शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रिडा मंडळ, शंकरनगर-अकलुज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय कुस्ती व त्रिमुर्ती केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रताप क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील व कुस्ती स्पर्धेचे प्रमुख संयोजक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

   शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रिडा मंडळ, शंकरनगर-अकलुज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०१ डिसेंबर २०२३ ते ०१ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते- पाटील उर्फ आक्कासाहेब यांची जन्मशताब्दी तसेच जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या वाटचालीनिमित्त दिनांक २९, ३० नोव्हेंबर २०२३ व ०१ डिसेंबर २०२३ रोजी शिवतिर्थ आखाडा,शंकरनगर-अकलूज येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती व त्रिमुर्ती केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 या सोहळ्यातील पहिल्या कार्यक्रमास अर्जुन पुरस्कार प्राप्त जागतीक दर्जाचे कुस्ती खेळाडू माजी आय.पी.एस. अधिकारी पै. कर्तारसिंग यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिले आहे.कुस्ती स्पर्धेचे प्रमुख संयोजक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रकुल स्पर्धा विजेते राम सारंगसाहेब त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक वसंतराव जाधव व उमेश भिंगे यांच्या वतीने स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले असून पै. कर्तारसिंग यांनी हे निमंत्रण स्विकारले आहे व या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची सहमती दर्शविली आहे. अशी माहिती प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील व कुस्ती स्पर्धेचे प्रमुख संयोजक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते- पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

 

Related posts

किती महागले गहू, तांदूळ? गेल्या पाच वर्षातील दरवाढीची केंद्राने दिली माहिती

Admin

अकलूज येथील समावि प्राथमिक शाळेत क्रीडामहोत्सव उत्साहात संपन्न

yugarambh

सूरज मांढरे साहेब राज्याचे नवीन शिक्षण आयुक्त.

yugarambh

आनंदी देशांच्या यादीत भारताचे ‘अखेर’ नाव आलेच…

yugarambh

पंतप्रधान मोदी यांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात संताप; सोशल मीडियावर पडसाद

Admin

तुमचं-आमचं जमेना अन् तुमच्याशिवाय भाषणच होईना; पंतप्रधानांच्या तासाभराच्या भाषणात फक्त काँग्रेस

Admin

Leave a Comment