लवंग (युगारंभ ) – बाभूळगाव ता. माळशिरस येथे मराठा आरक्षणाच्या समर्थनानिमित्त व मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीच्या प्रार्थनेनिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने कॅण्डल मोर्चा काढण्यात आला. सर्व धर्मीय महिला व पुरुष युवकवर्ग उत्स्फूर्थपणे सहभागी झाले होते .
Obc मधून मराठा आरक्षण मिळावे व सर्वाना कुणबी दाखला मिळावा या साठी चालू असलेले मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणसाठी पाठिंबा म्हणून व सरकार विरोधी कँडल मार्च मोर्चा बाभुळगाव ता माळशिरस येथे सकल मराठा समाज बाभुळगाव यांच्या वतीने काढण्यात आला होता.
या वेळी लक्षनीय अशी महिलांची उपस्थिती दिसून आली. मराठा समाजाला आरक्षणाची सर्वच दृष्टीने खरोखर गरज आहे.या विषयावर लालासाहेब पराडे पाटील, सचिन पराडे पाटील, प्रा. बाळासाहेब पराडे पाटील, गोविंद मिटकल तसेच सौ. मनीषा मिटकल यांनी आपल्या मनोगतातून पटवून दिले… बाभुळगावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते…