लवंग (युगारंभ )- सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2023 अंतर्गत दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी लवंग ता. माळशिरस मध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये सरपंच पदासाठी 1 व सदस्यांसाठी 13 अशा एकूण 14 जागांसाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
लवंग मध्ये एकूण पाच प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये 2 मतदान केंद्र, प्रभाग क्रमांक 2 मध्ये 2 मतदान केंद्र, प्रभाग क्रमांक तीन मध्ये 1 मतदान केंद्र, प्रभाग क्रमांक चार मध्ये 1मतदान केंद्र व प्रभाग क्रमांक पाच मध्ये 2 मतदान केंद्र. अशाप्रकारे एकूण 8 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली.
-
यामध्ये लवंग गावचे सरासरी मतदान 82.97 % इतके झाले.
-
प्रभाग क्रमांक 1 मध्ये 923 मतदारांनी 83.32 % मतदान केले.
-
प्रभाग क्रमांक 2 मध्ये 1113 मतदारांनी 81.91% मतदान केले.
-
प्रभाग क्रमांक 3 मध्ये 507 मतदारांनी 83.38 % मतदान केले.
-
प्रभाग क्रमांक 4 मध्ये 620 मतदारांनी 86.23 % मतदान केले.
-
प्रभाग क्रमांक 5 मध्ये 825 मतदारांनी 80.01 % मतदान केले.
अशाप्रकारे एकूण 3988 मतदारांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवून एक सरपंच व 13 सदस्यांची निवड मतदान पेटीत बंद केली आहे.
उद्या दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होणार असून 14 जागांचे भवितव्य मतपेटीत मतदारांनी बंद केले आहे. उद्या सकाळी नऊ वाजता या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मतदारांचा कल लक्षात येईल.