लवंग (युगारंभ )-सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना यशवंतनगर व दि सासवड माळी शुगर माळीनगर या दोन कारखान्याचा सन 2023 /2024 चालू गळीत हंगाम चालू झाला आहे .या दोन कारखान्याचे ऊस वाहतूक करणारे ट्रक्टर संगम ( इंगळेवस्ती) या गावी ऊसाचे ट्रॅक्टर रोड वरती चढत नसल्या कारणाने आपल्या साखर कारखान्याकडून तेथे ट्रॅक्टर ओढण्याची सुविधा करावी अन्यथा युवा सेनेच्या वतीने बुधवार दि 15 /11/2023 रोजी सकाळी 10:00 वाजता संगम येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र चौगुले साहेब व दि सासवड माळी शुगर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश आप्पा गिरमे साहेब यांना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता भाऊ साळुंखे यांच्या वतीने देण्यात आले.
सद्या 2023/ 2024 सालचा ऊस गाळप हंगाम चालू झाला असून या साखर कारखान्यास माढा तालुक्यातून शेकडो ऊसाचे ट्रॅक्टर ऊस वाहतूक करत आहेत .ते ट्रॅक्टर संगम या गावी इंगळे वस्ती म्हणजे भिमा नदीच्या बाजूला रोड वरून चढत असताना तो चढ चढू शकत नाहीत . बरेच ट्रॅक्टर चढ चढत असताना परत पाठी मागे येत असतात .त्यामध्ये मोटार सायकल, अनेक फोरव्हीलर चे अपघात होऊन सन 2022 /2023 मध्ये संगम इंगळेवस्ती भिमा नदीच्या कडेला रोड वरती 4 लोकांचे प्राण ही गेलेले आहेत त्याची नोंद अकलूज पोलीस स्टेशन मध्ये झालेली आहे .
काही वेळेस ते ट्रॅक्टर चढावरून न चढल्यास चालक ऊसाच्या ट्रेलरला मोठ मोठाले दगड लावून ते ट्रॅक्टर आणी ट्रॉली थांबण्याचे प्रयत्न करतात व ते दगड तेथेच रोड वरती ठेवून निघून जातात .त्या रोड वरील दगडांना टू व्हिलर फोर व्हीलर धडकून अनेक अपघात होत आहेत .अनेक वाहनांचे नुकसान ही खूप झाले आहे. तेथे दोन दोन तास ट्रॅफिक जाम होत आहे. ऍम्ब्युलन्स किंवा हॉस्पिटल मध्ये जाणारे प्रवाशी अडकून पडत आहेत . त्यामुळे आपल्या कारखान्याकडून एक ट्रॅक्टर व एक शिपाई 24 तास ठेऊन ऊसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर ओढून काढावेत अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी गणेश भिताडे, सागर साळुंखे, युवराज पवार, माऊली पराडे,कविराज पराडे,अविनाश पराडे, चेतन केचे,गणेश सुद्रीक, बापू सुद्रीक, दादा साळुंखे, विक्रम साळुंखे,आदित्य काकडे, सचिन साळुंखे, अजय पवार,आदित्य इंगळे इ. युवासैनिक उपस्थित होते