अकलूज (युगारंभ ): पुणे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती इंदापूर सन 2023-24 केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना अंतर्गत एक दिवसीय ‘घरकुल भेट अभियान दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी इंदापूर तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात होणार आहे.
पंचायत समितीने नियुक्त संपर्क अधिकारी घरकुलांना भेटी देऊन मोदी आवास योजनेचे नवीन लाभार्थी स्थळ पाहणी करणे. रमाई, यशवंत व दिव्यांग नवीन लाभार्थी स्थळ पाहणी करणे. प्रधानमंत्री, रमाई, यशवंत व दिव्यांग आवास योजने अंतर्गत अपूर्ण घरकुले भेटी व सुरु नसलेले अपूर्ण घरकुल भेटी. लाभार्थी पाया खोदाई समिती पत्र घेणे. असा कार्यक्रम पंचायत समिती इंदापूर विभागामार्फत आयोजित केला असल्याची माहिती गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिली.